आदिवासी क्रांती सेनेतर्फे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील वाल्मीक नगर हनुमान मंदिर येथे श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

 

मंगळवार दि. २३ ऑगस्ट रोजी पुण्यतिथीनिमित्ताने संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरक्षक दिलीप भागवत यांच्या हस्ते पूजन  करण्यात आले.  जळगाव शहरातील प्रथमच वाल्मिक नगर कांचन नगर परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित दिली. हा कार्यक्रम आदिवासी क्रांती सेना व नाभिक समाजातर्फे करण्यात आला.  याप्रसंगी  प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, आदिवासी क्रांती सेनेचे सस्थापक प्रमुख मोहन शंखपाळ,  रवी ठाकरे ,लीलामाई फॉऊडेशनचे अश्विन शंखपाळ , अरुण इंगळे तसेच वाल्मीक नगर परिसरातील कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाभिक समाजाचे संजय सोनवणे, दुकादार टपरीधारक संघटनेचे अध्यक्ष व रमेश महाले समाज कार्यकर्ते मोहन श्रीखंडे, चेतन फुलपगारे, भूषण सोनवणे, रवि वाघ, शरद आमोदकर, नरेंद्र सोनवणे, राजू आमोदकर, शंकर सूर्यवंशी, लीलाधर सोनवणे, विजय मोरे, बापू सोनगिरे, गुलाबराव सोनवणे, दिलीप तांदूळकर परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांचे आदिवासी क्रांती सेने तर्फे स्वागत करण्यात आले.

Protected Content