यावल, प्रतिनिधी । कोरोना या विषाणु आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असुन यातील सर्वात महत्वाचा विषय आहे सोशल डिस्टन्सिंग पाळने. यानुसार पवित्र रमजानच्या निमित्ताने सर्व मुस्लीम बांधवांनी सार्वजनिक ठिकाणी धार्मिक स्थळात ( मस्जिद ) मध्ये गर्दी जमवुन सामुहिक नमाज पठण टाळावे व आपआपल्या घरी आपल्या कुटुंबासोबत पवित्र रमजान ईद साजरी करावी असे आवाहन यावलचे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी म्हटले आहे.
यावल पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी काल सायंकाळी ईदच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला शहरातील सर्व मस्जिद ट्रस्टच्या विश्वतांशी तसेच मुस्लीम धर्मगुरू मुल्ला मौलवी, मौलाना व शांतता समितीचे सदस्य हाजी शब्बीर खाव मोहम्मद खान , ईदगाह कमेटी ट्रस्टचे हाजी ईकबाल खान नसीर खान , हाजी गफ्फारशाह , नगरसेवक सैय्यद युनुस सेय्यद युसुफ यांच्यासह गावातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते. चंद्रदर्शनानंत साजरी होणाऱ्या पवित्र रमजान ईदच्या पार्श्वभुमीवर शांतता समितीची बैठकी घेण्यात आली. बैठकीस उपस्थितीत समाजबांधवांना या वर्षीची रमजान ईदची नमाज पठणाबाबत व कोरोना सारख्या आपातकालीन परिस्थितीत शासनाचे आदेशाच्या अधिन राहुन आपण सर्व धार्मीक कार्यक्रम नियमांचे काटेकोर पालन करीत साजरे करायचे असल्याचे धनवडे यांनी सांगितले. यावेळी कोरोना सारख्या महामारीच्या संकटासमयी यावलकरांनी दाखलेल्या संयम शांती व शिस्तप्रिय वागणुकी च्या कार्याचे विशेष कौतुक करून पोलीस प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल नागरीकांचे आभार मानले. याप्रसंगी पोलीस उप निरिक्षक विनोद खांडबहाले उपस्थितीत होते.