डी.के. पेट्रोलपंपावर चोरीचा प्रयत्न फसला : दोघांना अटक

यावल प्रतिनिधी । येथील यावल चोपडा मार्गावरील जुन्या चोपडा नाका परिसरातील पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने चोरीचा प्रयत्न केल्या असून त्या हा प्रयत्न फसला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून यावल पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. 

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार यावल शहरातील चोपडा मार्गावरील परवेज खान मोहसीन खान यांच्या मालकीच्या डी के पंपावर काल बुधवार दिनांक २ जुनच्या रात्रीच्या सुमारास वेळ रात्री ८ ते सकाळच्या ८ वाजेपावेतोपंपावरील कर्मचारी विजय गणेश सोनवणे राहणार बाहेरपुरा यावल ( पेट्रॉल पंपावरील ऑपरेटर ) यांच्यासह हसन अली हैदर अली रा साकळी ता . यावल आणी अब्रार रहीम पटेल रा .कोरपावली ता यावल हे माझ्या सोबत कामावर होते.

 पंपावर नोझल कर्मचारी काम करणारे सेल्स रुम मध्ये रात्री झोपलेले असतांना दिनांक ३ जुनच्या रात्री .४० वाजेच्या सुमारास अचानक टेबलावरून काहीतरी वस्तु पडल्याचा आवाज झाल्याने विजय सोनवणे यांना जाग आली असता आमच्या सोबत पंपावर कामास असलेला नुसरत सलीम शेख राहणार खिरनीपुरा यावल व या तिघकर्मचारी यांच्या सोबत कामास असलेला मात्र कामावर न आलेल्या पैशांच्या बॅगा घेवुन जातांना सोनवणे यांनी त्यास बाहेर उभी असलेल्या मोटरसायकलकडे जातांना पाहीले व धाव घेत त्याच्या ताब्यातुन पंपावरील पॅट्रोल व डिझेल विक्रीच्या ४४ हजार रुपये असलेल्या बॅगा झटापटीनंतर ताब्यात घेतल्या. 

यात संधी साधुन नुसरत खान हा मोटरसायकलवर त्याच्या सोबत असलेला अदनान नबी देशमुख रा . यावल या दोघांनी पळ काढला असुन, एका कर्मचाऱ्याच्या जागृतपणामुळे पंपावरील चोरीचा प्रयत्न फसला , यासंदर्भात पंपावरील ऑपरेटर विजय सोनवणे यांनी तक्रार दिल्याने पोलीसात नुसरत सलीम खान आणी अदनान नबी देशमुख दोघांविरूद्ध संगनमताने चोरी करण्याचे प्रयत्नाचा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन दोघांना अटक करण्यात आले असुन तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अजमल पठान , पोलीस अमलदार संजय तायडे , पोलीस अमलदार सुनिल तायडे हे करीत आहे.

Protected Content