मुसळी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील मुसळी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा फडकवला असून नवनिर्वाचीत सरपंच व उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांचा माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी आज सत्कार केला.

 

मुसळी येथील ग्रामपंचायतीतील नवनिर्वाचीत लोकप्रतिनिधींनी आज माजी पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यात सरपंच श्रीमती सपना अरुण मोरे.उपसरपंच आजम शेख मण्यार यांच्यासह सौ.माधुरी गणेश  मराठे, माजी सरपंच व सदस्या सुरेखा सुरेश गुंजाळ, कविता शंकर पाटील, वसंत भिल यांच्या समावेश होता. या कार्यकारिणीचा आ. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर आगामी काळात मुसळीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही आमदार गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.

 

या वेळी माजी सभापती सचिन पवार, माजी युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, केतन पोळ, किशोर पाटील, दोनगाव,गोकुळ नाना, वसंत पाटील, अर्जुन पाटील, वसंत गुंजाळ, नामदेव पाटील, राजेंद्र पाटील, रघुनाथ दादा, दिलीप पाटील, पुंडलिक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Protected Content