जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणासह वडिलांना बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  मागील भांडणाच्या कारणावरून तरुणांसह त्याच्या वडिलांना धारदार वस्तूने वार करून बेदम मारहाण करण्याची घटना नशिराबाद येथे घडली आहे. याबाबत शनिवार ६ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, शोयब शरीफ पिंजारी (वय-२४) रा. मोमिन मोहल्ला, नशिराबाद ता. जि. जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवार २ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास शोएब हा त्याच्या घरी बसलेल्या असताना जुन्या वादातून त्यांच्या गल्लीत राहणारा सादिक शहा हाफिजउल्ला शहा यांच्यासह इतर १९ जणांनी येवून अश्लिल शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. तर शोएबचे वडील शरीफ रज्जाक पिंजारी (वय-५०) यांना चाकूने वार करून गंभीर दुखापत केली. याबाबत शोएबने शनिवारी ६ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात  सादिक शहा हाफिजउल्ला शहा, वसीम शहा, यासीनशहा नूरशहा, आसिफ शहा शरीफ शहा, मुक्तार शहा खलील शहा, फिरोज शहा नुरशहा, शब्बीर शहा मुसा शहा, सलीम शहा नूर शहा, बकश शहर फरीद शहा, साजिद शहा फरीद शहा, हरीष शहा कालु शहा,  वकार शहा महमूद शहा, अल्लू शाबीर शहा,  शकील शहा बशीर शहा,  मेहमूद शहा कादर शहा , सद्दाम शहा कासम शहा, फरिद शहा  आणि कासम शहा सर्व रा. मोमिन मोहल्ला, नशिराबाद ता.जि.जळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content