मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी आज तहसील कार्यालयात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीत काहींना लॉटरी तर दिग्गजांना फटाका बसला आहे.
तहसील कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यासाठी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार प्रदीप जाबरे यांच्यासह कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच असंख्य नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होते.
आज जाहीर झालेली आरक्षण सोडतीत सर्वसाधारण-24, नागरिकांचा मागास प्रवर्ग-17, अनुसूचित जाती-जमाती- 11 असे आरक्षण निघाले आहे.
अनुसूचित जाती- 9, सर्वसाधारण पुरुष -चिखली, जोनधनखेडा, सारोळा, चारठाणे, कर्की, नांदवेल, मालेगाव, कोथळी, पिंपरीपंचम ,पिंप्रि आकाराउत, टाकळी, बोदवड
सर्वसाधारण महिला – शेमळदे ,बोरखेडा, पंचाने, राजुरे, हिवरा, पातोंडी, नायगाव , वायला, निमखेडी बुद्रुक, मानेगाव, मेहून,पुरनाद
नागरीकांचा मागास प्रवर्ग(O.B.C.) पुरुष – नरवेल, चिंचोल, मुंढोलदे , सातोड कुऱ्हा, इच्छापुर, चिंचखेडा खुर्द, हलखेडा
नागरीकांचा मागास प्रवर्ग(O.B.C.)महिला – मेलसांगवे, पिम्प्रिनांदु, भोटा, चिचखेदा बु, सालबर्डी, महालखेडा, कोर्हाला, पिम्प्राला, घोड़सगाव
अनुसूचित जमाती (S.T.) पुरुष – खामखेडा, लोहारखेडा, वढवे, सुले, बेलसवाड़ी,
अनुसूचित जमाती (S.T.)महिला – सुकली, वढोदा, उचंदा, धामंदे, रुइखेडा, हरताला,
अनुसूचित जाती (S.C.) पुरुष – धामनगाव, काकोडा, तरोड़ा, चांगदेव, निमखेडी खुर्द,
अनुसूचित जाती (S.C.)महिला – अंतुर्ली, दुई, पारबी, थेरोला याप्रमाणे आरक्षण सोडत जाहिर करण्यात आली.
https://www.facebook.com/508992935887325/videos/697121370967842