जळगाव तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीच्या सरपंच महिला होणार (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी महिलांसाठी असलेल्या ५० टक्के आरक्षणानुसार ३६ गावांतील महिला सरपंचपदासाठी आज पंचायत समिती सभागृहात सोडत काढण्यात आली. याप्रसंगी प्रांत प्रसाद मते तहसीलदार नामवेद पाटील, मंडलाधिकारी योगेश नन्ववरे, जळगाव ग्राम विस्तार अधिकारी नीलकंठ ढाके उपस्थित होते. सोडत मंडलाधिकारी योगेश नन्ववरे यांचे सुपुत्र सम्यक योगेश नन्ववरे यांनी काढली.

या सोडतीत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण तालुक्यातील ७० जागांपैकी अनुसूचित जातीसाठी ३, अनुसूचित जमाती ९, नागरिकांचा मागास प्रवर्ग १० व सर्वसाधारण महिलांसाठी १४ अशा एकूण ३६ जागां आरक्षित करण्यात आल्या.

प्रवर्गानुसार महिला सरपंचपदासाठी  आरक्षित गावे पुढील प्रामाणे

अनुसूचित जाती पदासाठी आरक्षित गावे (६) ३
रायपुर, विदगाव, तरसोद, वावडदे-बिलखेडा, पाथरी, म्हसावद यातील तीन रायपुर, म्हसावद व पाथरी महिलांसाठी आरक्षित करण्यात आली.

अनुसूचित जमाती (१७) ९
आसोदा, वडली. शिरसोली प्र न, धानवड, जवखेडा, नशिराबाद, सुजदे, भोलाणे, घार्डी, रिधुर, देऊळवाडे, फुपणी, करंज, पिलखेडे, धामणगाव, शेळगाव, आवार पैकी ९ गावे आसोदा,शिरसोली प्र न, नशिराबाद, सुजदे, घार्डी, रिधुर, देऊळवाडे, फुपणी ही महिलांसाठी आरक्षित करण्यात आली.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (१९) १०
गाढोदे, नांद्रा बु., भादली बु. , कंडारी, चिंचोली , आव्हाणे, लामंजन, शिरसोली प्र. बो. , खेडी खु. , ममुराबाद , जळके, डोमगाव, रामदेववाडी ,सुभाषवाडी, जामोद, उमाळे, मोहाडी, सावखेडा खु., बोरनार यापैकी नांद्रा बु., कंडारी, आव्हाणे, लामंजन, डोमगाव, सुभाषवाडी, उमाळे, बोरनार, रामदेववाडी, सावखेडा खु. येथील आरक्षण महिलांसाठी राखीव झाली आहेत.

सर्व साधारण पदाच्या सरपंच पद (२८) १४
सावखेडा बु. , दापोरे , धानोरे बु. , कानळदा, डिकसाई, कठोरा, भोकर, जळगाव खु., मन्यारखेडे, कुसुंबे खु. कडगाव, वडनगरी, नांद्रा खु., किनोद, भादली खु., वसंतवाडी , वराड बु., विटनेर, पळसोद, निमगाव बु., बिलवाडी , लोणवाडी बु., नांदगाव, आमोदे बु., बेळी , फुपनगरी, तुरखेडे, कुवारखेडे पैकी महिला जनरलसाठी डिकसाई, कठोरा, भोकर, मन्यारखेडे, कुसुंबे खु. कडगाव, नांद्रा खु., भादली खु., वराड बु., बेळी, पळसोद, नांदगाव, फुपनगरी ही गावे आरक्षित करण्यात आले.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/163897831933873

Protected Content