मुक्ताईनगर प्रतिनिधी । राज्याचे पर्यावरण, पर्यटन राज्य शिष्टाचार मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवसेना मुक्ताईनगर शाखेतर्फे कोरोना योद्ध्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्येत वाढ होती. मृत्यूचा दरही वाढला होता. अशा बिकट परिस्थितीत मुक्ताईनगर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे, डॉ. अच्छा मॅडम तसेच संपूर्ण टीम मुक्ताईनगर मधील डॉ. एन. जी. मराठे, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. योगेश पाटील, शोभा हॉस्पिटल आणि तालुक्यातील पॅथॉलॉजी लॅबचे डॉक्टर्स आणि त्यांचा स्टाफ त्या लोकांनी मिळून जिवाची पर्वा न करत कोरोना रुग्णांची सेवा केल्याबद्दल युवा सेनेतर्फे या कोरोना योद्ध्यांचा सन्मानपत्र वाटप करण्यात आले. प्रमाणपत्र वाटप करतेवेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, तालुका युवा सेना तालुका प्रमुख पंकज राणे, प्रमोद सौंदळे, राहुल हरणे, पप्पू मराठे, सोपान मराठे, गणेश भोई, आकाश भोई, गणेश भोजने, विशाल चव्हाण, तुषार कोळी, कुणाल निंभोरे, असंख्य युवासेना कार्यकर्ते हजर होते.