मोदी पुन्हा पंतप्रधान होतील ही काळ्या दगडावरची रेघ- ना. पंकजा मुंडे

pankaja

 

जळगाव (प्रतिनिधी )  मी चांदयापासून बांदयापर्यत सभा घेतल्या.  तिकडे आमच्या आक्षेप घेतात की बापाचा नाव का लावतात ? मी मरेपर्यंत बापाचे नाव लावणार कारण वडिलांनी वंचितांना न्यायासाठी लढणार त्यामुळे हे नाव लावणार मोदी हे पंतप्रधान होतील ही काळ्या दगडाची रेष आहे. मोदी यांचे आजी पणजो कोणीच राजकारणात नव्हते त्यांचे कुटुंब गरीब होते, त्यांनी गरिबी जवळून पहिली असल्याने त्यांना गरिबांचे दु:ख माहित असल्याचे प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी केले. त्या ) भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती सेना महायुतीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार उन्मेश पाटील  यांच्या प्रचारासाठी आज जळगाव येथे मेहरूण परिसरात आयोजित सभेत बोलत होत्या.

 

यावेळी मंचावर  आ.  राजूमामा भोळे, आ. उन्मेष पाटील, आ. चंदुलाल पटेल,  महापौर सीमा भोळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर विष्णू भंगाळे, मनपा सभागृह नेते ललित कोल्हे,  शिवसेना शहराध्यक्ष शरद तायडे, भाजपा गट नेते भगत बालनी,  मनपा विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, नगरसेवक कैलाश सोनवणे, गणेश सोनावणे, प्रशांत नाईक,विनोद मराठे, अल्पसंख्याक अध्यक्ष जाकीर पठाण, पंकज धनगर,  संजय घुगे, आरपीआयचे दीपक सपकाळे,   वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे, आदी उपस्थित होते.  याप्रसंगी  समस्त लाड वंजारी समाजाकडून तलवार देऊन  सत्कार करण्यात आला. पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, मोदी यांची सत्ता येण्यापूर्वी गावाबाहेर शैचालयाला बसत मात्र आता कोठेच हे  चित्र दिसत नाही. आज माझ्या आई बहिणी यांना  या त्रासातून बाहेर काढले आहे.  चुली समोर बसलोल्या आज उज्वला योजनेच्या माध्यमातून गॅस मिळाला आहे.  बँकामध्ये खाते उघडल्याने सरकारी योजनांचे पैसा थेट खात्यावर देणे सुलभ झाले आहे. दुष्काळ मध्ये अन्न धन्य दिले,  विमा दिला.   ब्रिटीशांची  औलाद म्हणजे काँग्रेस आहे.  त्यानी ब्रिटिशांच्या तोडा आणि राज्य करा यानितीचा वापर करून  फूट टाकून राज्य केले आहे.  कॉग्रेस याचे पिलू म्हणजे राष्ट्रवादी। आहे .  हे सरकार कोणासाठी आवश्यक युवकांसाठी , आपल्यासाठी, आपल्या देशाचे सीमा सुरक्षेसाठी हे सरकार आवश्यक आहे.  या जिल्ह्यासाठी ३५०  करोड आले  १४१  कोटी दिली.  स्किल डेव्हलपमेंटसाठी  निधी दिला आहे.   जशी सीमेवर सैनिकांची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे बोट च्या शाईच्या महत्व  असल्याने मतदान करण्याचे आवाहन केले आले.  दरम्यान, जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी सांगितले की,  आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही आपल्यातील गट तट बाजूला ठेवा ही निवडणूक गल्लीची नाही तर दिल्लीची आहे  हा परिसर कष्ट करणारा परिसर आहे. त्यांना विश्वास देतो याठिकाणी प्रक्रिया उद्योग कसे सुरू होतील हा विश्वास देतो.

Add Comment

Protected Content