चंद्रकांत भंडारी यांच्या पुस्तकाचे २६ नोव्हेंबर रोजी प्रकाशन

जळगाव प्रतिनिधी । येथील लेखक, समीक्षक व के.सी.ई. सोसायटीचे शालेय समन्वय चंद्रकान्त भंडारी यांनी लिहिलेल्या ‘पीटर ताबीची’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवार, दि.२६ नोव्हेंबर ‘पीटर ताबीची’ २०२० रोजी सकाळी ११ वा, वर्धिष्णू सोशल रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंट सोसायटीचे प्रणाली सिसोदिया व अद्वैत दंडवते यांच्याहस्ते, प्रशांत पब्लिकेशन्स (ज्ञानेश्वर मंदिर रोड, नूतन मराठा महाविद्यालया मागे) येथे होणार आहे.

सहा कोटी रूपयांचा ‘ग्लोबर टिचर पुरस्कार’ विजेत्या केनियन पीटर ताबीची याची प्रेरणादायी कथा भंडारी यांनी लिहिली असून ती जळगावच्या प्रशांत पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित होत आहे.

प्रकाशन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ओरिऑन इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य संदीप साठे तसेच ए.टी. शांबरे विद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे हजर राहणार आहेत. प्रकाशन संस्थेतर्फे रंगराव पाटील व प्रदीप पाटील यांनी या कार्यक्रमास शिक्षणप्रेमींनी हजर राहावे असे आवाहन केले आहे.

 

Protected Content