रावेरच्या हद्दवाढ झालेल्या भागात लवकरच कामे सुरू होणार- नगराध्यक्ष ( व्हिडीओ )

WhatsApp Image 2019 03 06 at 1.51.09 PM

रावेर (प्रतिनिधी)। सुमारे ८२ वर्षांनंतर रावेर नगर पालिकेची हद्द वाढ झाली असून सनाकडून मिळालेल्या गाइडलाइन्सनुसार पालिका हद्दीबाहेरील वसाहतींना सुविधा पुरवल्या जातील. या संदर्भात लवकरच आम्ही डीपीआर तयार करून प्रशासनाकडे सुपुर्त करणार आहोत. यामध्ये पाणी, वीज, रस्ते, स्वच्छतेवर भर असेल. पालिका हद्दवाढीचे श्रेय कोणी घेऊ नये, मी नगराध्यक्ष असताना शासनाकडे दोन वेळा त्यासाठी ठोस पाठपुरावा केला होता, असे नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले.

येथील नगरपालिकेच्या हॉलमध्ये नगरपरिषदेतर्फे हद्दवाढीची माहिती जनतेला देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, यावेळी दारा मोहम्मद बोलत होते. त्यांनी माजी मंत्री खडसे, खासदार रक्षा खडसे तर आमदार जावळे यांचे यावेळी खास आभार मानले. तसेच पाठपुरावा करणाऱ्या मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांचेही अभिनंदन केले. यावेळी पालिका हद्दी बाहेरील सुमारे २७ वसाहतींचा यात समावेश करण्यात आला असून ४.८५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आता नगरपालिकेच्या हद्दीत आले आहे. यामुळे सुमारे ४० हजार एवढी पालिकेची नवी जनता पुढचा २०२१ चा कारभारी निवडणार आहे. यावेळी अॅड. सूरज चौधरी, आसिफ मोहोम्मद यांनीही हद्दी बाहेरील वसाहतींची माहिती दिली. यावेळी पत्र परीषदेला सादीक मेंबर, असलउल्ला खान सुधीर पाटील, अॅड. योगेश गजरे, शेख कलीम, जगदीश घेटे, अय्यूबखा पठान, यांच्यासह काही नगरसेवक उपस्थित होते.

अशी झाली आहे हद्द वाढ :-
१ ) उत्तरेकडील भागातील – गट नं . १ , २ , ४ , ५ , ६ , ७ , ८ , ९ , १० , ११ , १३ , १४ , १५ , १६ , ३३ , ३४ , ३६ , ३७ , ३८ , ३९ , १७९६ ,

२ ) पुर्वेकडील भागातील – गट नं . ५३० , ५३१ , ५३२ , ५३३ , ५३५ , ५३६ , ५३७ , ५३८ , ५४० , ५४३ , ६१२ , ३२७ , ६९४ ,

३ ) पश्चिमेकडील भागातील – गट नं . ७०१ , ७०४ , ७०५ , ७०६ , ७०७ , ७०९ , ७१० , ९७ ११ (१) , ७११ (२) , ७११ (३) , ७१२ , ७३० , (७३१ , ७३३ , ७३४ , ७३६ , ७३७ , ७३८ , ९०३९ , ७४० , ७४१ , ७४२ , ७४५ , ७४७ , ७४८ , ७५० , ९०५१ , ७५२ , ७५३ , ७५४ , ७५५५ , ७५६ , ७५९७ , (७६० , ७६१ , ७६२ , ९७६३ , ७६५ , ९७६६ , १९५ , ११४० , ११४१ , ११४२ , ११४३ , ११४४ , ११४५ , ११४६ , ११४७ , ११४८ , ११४९ , ११५० , ११५१ , ११५२ , ११५५ , ११५६ , ११५९६ , ११५८ , ११५९ , ११६० , ११६१ , ११६२ , ११८७१ , ११७२ , ११७३ , ११७५ , ११७७ , १२५६ , १२५८ , १२५९ , १२६२ (१) १२६२ (२) १२६ ३ , १२६४ , १२६६ , १२६७ , १२७० , १२0१ , १२७२ , १२७३ , १२७४ , १२७६ , १२७८ , १२९०९ , १२८१ , १२८२.

१४ , १५ , १६ , १७ , १८ , १९ , २० , २१ , २२ , २३ , २४ , २५ , २६ , २७ , २९ , ३० , ३१ , ३३ , ३४ , ३५ , ३७ , ३८ , ३९ , ४९ , ५० , ५१ , , ५२ , ५३ , ५४ , ५५ , ५६ , ६८ , ६९ , ७१ , ७२ , ७३ , ७४ , ७८ , ७९ , ८० , ८२ , ८४ , ८९ .यांचा पालिका हद्दीत सामावेश झाला आहे.

नगरपालिकेला पॅकेज हवे- सोपान पाटील

दरम्यान, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी लाईव्ह ट्रेंड न्यूजशी बोलतांना रावेरची हद्दवाढ झाल्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले. मात्र वाढीव वस्तीसह शहराचा सर्वांगीण विकास करायचा असल्यास किमान चार-पाचशे कोटी रूपयांचे पॅकेज आवश्यक असून यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली.

पहा : नगराध्यक्ष दारा मोहंमद व सोपान पाटील रावेरच्या हद्दवाढीबाबत नेमके काय म्हणतात ते !

Add Comment

Protected Content