शिक्षकाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या नामदेव जाधवांवर अमळनेर पोलीसात गुन्हा

WhatsApp Image 2019 03 06 at 2.15.08 PM

अमळनेर (प्रतिनिधी)। शिक्षकांबद्दल अपशब्द वापरून त्यांची बदनामी करणाऱ्या पुणे येथील प्रा. नामदेव जाधव यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रा.नामदेव जाधव यांनी एका कार्यक्रमात शिक्षकांबद्दल बेताल वक्तव्य केले. शिक्षक (मास्तर) काही न शिकवता हजारो रुपये पगार घेतात आणि महिनाभर पाट्या टाकतात. शिक्षकांसारखी देशद्रोही जमात जगात कोणतीही नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रावसाहेब मांगो पाटील यांच्यासह विविध संघटनांनी याची गांभीर्याने दखल घेऊन अमळनेर पोलीस स्टेशनला शिष्टमंडळ घेऊन जाऊन निवेदन दिले. अमळनेर पोलिसात नामदेव जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

यावेळी डीवायएसपी रफिक शेख यांना देखील निवेदनाची प्रत देण्यात आलेली आहे. यावेळी रावसाहेब मांगो पाटील यांच्यासह दै. लोकमतचे पत्रकार तथा तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित हिते. यावेळी मधुकर चौधरी (शिक्षक सेना), सुरेश पाटील, वाल्मीक पाटील (मा.ग.संचालक), जितेंद्र शेटे (शिक्षक संघ), राजेंद्र सूर्यवंशी, गोकुळ पाटील, राजेंद्र सोनवणे (संचालक शिक्षक पतपेढी), सुनील सोनवणे, धीरज पाटील, संजीव सोनवणे, संजय साळुंखे, प्रदीपसिंह पाटील, दयानंद महाजन, केदारेश्वर चव्हाण, दिलीप सोनवणे, सुधाकर पाटील, किरण बाविस्कर, रामदास जाधव, अशोक ठाकूर, अशोक इसे, दिलीप भामरे, विजय चव्हाण, बापू चव्हाण, रवींद्र पाटील, सुनील मोरे, किशोर लोहार, संजय सिसोदे, दुर्गादास कोळी, किशोर देसले, मनोहर बाविस्कर, श्रीनिवास सोनवणे, रत्नाकर पाटील यांच्यासह अनेक शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content