दोन वर्षाच्या बालकाला पळविले; यावल पोलीसात गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी । शहरातील फैजपूर रोडवरील सुभानी पेट्रोलपंप परिसरातून दोन वर्षाच्या बालकाला तरूणाने पळवून नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. Kidnapped a two-year-old boy याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अधिक माहिती अशी की, सादीक शाह शहीद शाह (वय-२८) रा. गोशलपुर ता. सोहरा जि. जबलपुर (मध्यप्रदेश) हे कामाच्या निमित्ताने काही महिन्यांपासून शहरातील फैजपूर रोडवरील सुभानी पेट्रोल पंपाजवळील हरी ओमनगर येथे मोकळ्या जागेवर कुटुंबासह राहतात. मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या पुर्वी सादीक शाह याचा दोन वर्षाचा मुलगा अरमान सादीक शाह याला दिपक (पुर्ण नाव माहित नाही) याने अज्ञात कारणासाठी पळवून नेले. हा प्रकार सकाळी ४ वाजता समोर आला. Kidnapped a two-year-old boy संपुर्ण परिसर पिंजून काढला पंरतू बालक अरमान हा मिळून आला नाही. यावल पोलीस ठाण्यात सादीक शाह यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि ए.आय.पठाण करीत आहे. 

Protected Content