…आणि आ. चंद्रकांत पाटलांनी स्टींग ऑपरेशन करून लाचखोर विमा प्रतिनिधींना पकडले !

मुक्ताईनगर प्रतिनिधी । शेतकर्‍यांकडून लाच स्वीकारतांना विमा कंपनीच्या प्रतिनिधींना आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज पकडून दिले. विशेष म्हणजे आमदारांनी यासाठी महसूल प्रशासनासोबत स्टींग ऑपरेशन करून त्यांना रंगेहात पकडून दिल्याने परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.

याबाबत वृत्त असे की, विमा कंपनीचे प्रतिनिधी लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार काही शेतकर्‍यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. या अनुषंगाने आज काही जण शेतकर्‍यांकडून पैसे जमा करत असल्याची माहिती आमदारांना मिळाली होती. त्यांनी संबंधीतांना रंगेहात पकडण्यासाठी एक युक्ती केली. यात  आमदार चंद्रकांत पाटील यांनी वेशांतर करून विमा प्रतिनिधी पैसे घेत असल्याच्या ठिकाणी स्टींग ऑपरेशन केले. यानंतर ते स्वत: घटनास्थळी पोहचले. याप्रसंगी त्यांच्या सोबत तहसिलदार श्‍वेता संचेती, कृषी अधिकारी अभिनव माळी यांच्यासह बजाज अलियान्ज विमा कंपनीचे जळगाव येथील अधिकारी असे पथक होते.

या बैठकीत आमदारांसह पथकाने विमा कंपनीच्या दोन प्रतिनिधींना लाच स्वीकारताच दोघांना रंगेहाथ पकडले.  याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Protected Content