नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी । नवी मुंबईच्या विमानतळास आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांचे नाव तातडीने देण्यात यावे, अशी मागणी ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.          

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व कृषी औद्योगिक क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचे कार्य हे संबंध महाराष्ट्राने अनुभवले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील विमानतळास वसंतराव नाईक यांचे नाव तात्काळ द्यावे अशी मागणी ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनने तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदनाद्वारे केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उधवजी ठाकरे, शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार,व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ही ईमेल द्वारे  देण्यात आले आहेत. तत्कालीन विरोधी पक्षांनी नव्या मुंबईच्या निर्मितीला प्रचंड विरोध दर्शविला होता. परंतु दूरदृष्टी असणारे विकासाचे महानायक वसंतराव नाईक यांनी नवी मुंबई उभारली. हे देशभर सर्वश्रुत आहेत. त्यांच्या या अद्वितीय कार्याच्या सन्मानार्थ नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणी ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनने केली आहेत. १ जुलै रोजी कृषी दिन असल्याने याच दिवशी वसंतराव नाईक यांचे नावाने विशेष घोषणा करावी अशी विनंती हि संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनाप्रसंगी ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड, महाराष्ट्र अखिल भारतीय तांडा सुधार समिती उपाध्यक्ष योगेश्वर राठोड, विकास सोसायटी माजी चेअरमन दिनकर राठोड, जिल्हा परिषद सदस्य सिताराम चव्हाण, किसन राठोड, विलास चव्हाण, आबा जाणे, दादासाहेब चव्हाण, भीमराव जाधव, अनिल चव्हाण, विलास जाधव, रुपेश जाधव, विनोद राठोड, जगन राठोड व  राहुल राठोड आदी उपस्थित होते.

 

Protected Content