शिवव्याख्याती गायत्री सरोदे हिचा ‘माँ साहेब जिजाऊ राष्ट्रीय पुरस्काराने’ गौरव

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भोटा येथील सामान्य कुटुंबातील शिवव्याख्याती कु. गायत्री सरोदे हिचा नाशिक येथे माँ साहेब जिजाऊ राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

 

केवळ आठवीत शिकणारी गायत्री सरोदे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभू महाराज,राजमाता जिजाऊ  यांच्याविषयी प्रभावी व अभ्यासपूर्णरित्या व्याख्यान देते. सोबत दररोज शिवदिनविशेषचे व्हिडिओ बनवून सर्वत्र पोहचविते. नाशिक येथील श्री.साई बहुउद्देशीय संस्थेमार्फत 8 मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त माँ साहेब जिजाऊ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गायत्रीच्या वक्तृत्वाचा व तिच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

 

यापूर्वी सुद्धा गायत्रीला काही पुरस्कार मिळालेले आहेत. गायत्रीचे वडील राजू सरोदे व आई वंदना हे शेतमजुरी व शेळीपालन करतात. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असून सुद्धा ते मुलीसाठी झटत आहेत. एवढ्या लहान वयात गायत्रीच्या या अभिमानास्पद कार्यासाठी पंचक्रोशीतून तिचे अभिनंदन होत आहे. शिवशंभू संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादेव भाऊ पवार, प्रवक्ते संभाजी भाऊ वरपडे, महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख विजय भाऊ भोसले यांनी गायत्रीचे कौतुक केले आहे. तिला पुढील वाटचालीसाठी आर्थिक व इतर आवश्यक मदत करण्यासाठी मुक्ताईनगर तालुक्याचे युवक काँग्रेस अध्यक्ष नरेश पाटील (खंडागळे) हे पुढाकार घेत आहेत.

Protected Content