मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | 8 ते 10 डिसेंबर 2022 पर्यंत चालणाऱ्या खेळ महोत्सवाला स्वर्गीय निखिल खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये सन 2022- 23 खेळ महोत्सव अंतर्गत विविध खेळांना जल्लोषात सुरुवात केली आहे.
मुक्ताईनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत व त्यांच्या सदिच्छा पर शाळेचे मुख्याध्यापक व्ही. के. वडस्कर यांनी विद्येची देवता सरस्वती तथा भारतीय खेलरत्न भारतरत्न पुरस्कार विजेते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून तथा तालुकास्तरावर विविध खेळ स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या तथा जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व गुणगौरव सोहळा नुकताच पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन याच क्षणी दिल्ली दौऱ्यावर असलेल्या संस्थेच्या सचिव तथा लोकसभा खासदार रक्षाताई खडसे तथा संस्थेचे अध्यक्ष रमेश महादू खाचणे काही कारणास्तव कार्यक्रमाला उपस्थित न राहू शकल्यामुळे त्यांनी संपर्क ध्वनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना भावी वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा तर शाळेचे मुख्याध्यापक व्ही. के. वडस्कर यांनी खेळ महोत्सवा प्रति सर्व विद्यार्थी खेळाडूंना प्रतिज्ञा देत विविध खेळाविषयी केले त्यांचे मार्गदर्शन खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
मुख्य म्हणजे बालपण हे खेळाविना निरागस आहे आणि हा वास्तवाद आपण या मोबाईलच्या युगात आपल्या चिल्यापाल्यांसोबत अनुभवत आहोत म्हणून खेळांचे महत्त्व हे जीवनात अनन्यसाधारण आहे म्हणूनच म्हटले जाते की खेळ हे आपल्याला नेहमी ताजेतवाने व चिरतरुण राहण्याची महत्त्वाची साधना आहे व ती आपण जीवनभर जोपासली पाहिजे व खेळ जगतात उत्कृष्ट खेळाडू होऊन नवनवीन कीर्तिमान स्थापित करावे अशी अपेक्षा आपल्या विद्यार्थ्यांकडून त्यांनी व्यक्त केली. तर सर्व विद्यार्थ्यांनी विविध खेळ प्रकारात आपला सहभाग नोंदवून खेळ महोत्सवाची रंगत वाढवली.
शाळेचे पी. टी. शिक्षक तथा स्पोर्ट कमिटीचे अध्यक्ष रमेश बोदडे व कमिटीचे अन्य सदस्य वर्गशिक्षक तथा विषय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व अनमोल सहकार्य लाभले तर आजच्या खेळ दिवसाचे मराठीतील कॉमेंट्री व फोटोग्राफी तथा व्हिडिओग्राफी सहशिक्षक स्वप्निल चौधरी व वैभव पाटील यांनी केली तर या कार्यक्रमाचे छान असे सूत्रसंचालन तुषार पाटील यांनी केले.