मुक्ताईनगर येथे स्व. निखिलभाऊ खडसे इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, स्व. निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडियम स्कूल येथे खासदार रक्षा खडसे व मुक्ताईनगरचे पोउनि परविण तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्ष २०२१-२२ चा निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला .

 

विद्यार्थी जीवनातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हा भावी शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वपूर्ण पडावा असतो; याच वयात मुलांमध्ये योग्य संस्काराची भावी जीवनाचा जीवनपट रंगीबेरंगी रंगांनी रंगवण्याची जडणघडण शाळेमार्फत कुटुंबामध्ये आणि सभोवतालच्या सामाजिक वातावरणातून घडत असते; म्हणूनच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाला भावी आयुष्य रूपी जीवनाचा पाया संबोधला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे याला व्यक्ती जीवनातील ब्रह्मचार्य आश्रम असे म्हटले आहे, कारण हा काळ विद्या अनुभव ग्रहण करण्याचा असतो व नंतर हे ज्ञान आणि अनुभव व्यक्तीला आपल्या गृहस्थ आश्रम म्हणजे प्रत्येक्ष जीवनामध्ये व्यव्हारिक रूपाने व वास्तववादी परिस्थितीशी जुळवून आपला व समाजाचा उत्कर्ष करून मातृभूमीचे आणि आपल्या आई-वडिलांचे व गुरुजनांचे ऋण फेडावे लागते.

आजची परिस्थिती बदललेली आहेत. म्हणून विद्यार्थ्यांनी वाईट गोष्टींचे अंधानुकरण न करता योग्य रीतीने व आत्मसात केलेल्या कौशल्याने आपले जीवन आजच्या युगानुरुप आधुनिक करावे असे मनोगत रक्षाताई खडसे लोकसभा खासदार तथा संस्थेच्या सेक्रेटरी यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्याबद्दल मार्गदर्शनपर भाषणात व्यक्त केले तर समाजात आपले व आपल्या आई-वडिलांचे, गुरुजनांचे नाव उंचावेल व स्वतःची ओळख निर्माण करता येईल असे कार्य विद्यार्थ्यांनी विद्यार्थिदशेपासून केले पाहिजेत असे मत मुक्ताईनगर चे पोलीस उपनिरीक्षक परविण तडवी मॅडम यांनी आपल्या मनोगतपर भाषणात व्यक्त केले.

 

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण म्हणजे भावी जीवनाच्या वाटचालीतील शिदोरी होय जी आपणास आपल्या आई-वडील शिक्षक व समाजातून विद्यार्थी जीवनात प्राप्त होत असते हे शिक्षण आणि अनुभव विद्यार्थ्यांना भावी जीवनाची रूपरेषा आखण्यास साह्यभूत ठरत असते असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना या शुभ प्रसंगी भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतांना शाळेचे प्राचार्य व्ही. के. वडस्कर यांनी व्यक्त केले तर शाळेचे शिक्षक श्री गणेश कोळी यांनी गुरु शिष्य यावर आधारित स्वयम् रचित कविता सादर करून  सर्वांना भावनाविवश केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक तुषार पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी शाळेचे शिक्षक दार,  स्वप्निल चौधरी,  गणेश बोदडे,  वैभव पाटील, निळे, मालगे, सतिश गायकवाड तथा राजश्री फेगडे, करुणा देशमुख मॅडम दिपाली, वाघुळदे मॅडम इतर शिक्षक व शिक्षिका यांचे अनमोल सहकार्य लाभले.

 

अशाप्रकारे शाळेचे व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या भावी आयुष्याच्या वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्यात तर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेचे व  शिक्षकांचे आभार व्यक्त केले अशा प्रकारे हा कार्यक्रम विविध रंगमयी अनुभवात व भावनात रंगून गेला.

Protected Content