भुसावळ येथे आषाढीनिमित्त वृक्षारोपण, दिंडी सोहळा

WhatsApp Image 2019 07 11 at 16.48.19

भुसावळ प्रतिनिधी । येथील पुंडलिक गणपतबऱ्हाटे माध्यमिक विदयालय, स्वा.सै.कृ.पा. पाटील प्राथमिक विदया मंदिर, सुमनताई बऱ्हाटे पूर्व प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विदयमाने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दिंडी सोहळा व वृक्षारोपण तसेच बालक-पालक प्रबोधन सुमनताई बऱ्हाटे सांस्कृतिक सभागृहात घेण्यात आले.

दिंडी सोहळ्यात शिशु विहार व प्राथमिक विदया मंदिराच्या विदयार्थ्यांनी दिंडीत छान वेशभुषा करून मुलींनी तुळशी वृंदावन घेऊन विठोबा नामाचा गजर टाळ मृदुगाच्या आवाजात केला. विशेष म्हणजे त्यात ह.भ.प. दिपक महाराज यांनी पालखीतील विठूरायाची पुजा केली. त्यानंतर संस्थाध्यक्ष परिक्षीत बऱ्हाटे यांनी वेषभूषेतील विठ्ठलाला बुक्का लावुन व वेषभूषेतील रूक्मीणीला हळ्द-कुंकु लावून औक्षण केले. विदयार्थ्यांनी दिपक महाराजासोबत टाळ मृदुगावर दिंडी सोहळ्याचा आनंद लुटला. त्यानंतर ह.भ.प. दिपक महाराजाच्या शुभहस्ते, संस्थाध्यक्ष परिक्षीत बऱ्हाटे, उपाध्यक्ष, पुंडलिक बऱ्हाटे, संस्थेचे सचिव सुभाष बऱ्हाटे, संचालक यशवंत दोधू भंगाळे, मुख्याध्यापक सुधीर पाटील आदिच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

बालक-पालक प्रबोधन कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांना उद्देशुन ह.भ.प. दिपक महाराज यांनी सांगितले की, समस्या कोणतीही असो ती प्रसंगानुसार सोडवता आली पाहिजे. पालकांनी शिक्षकांच्या परिश्रमांना प्रतिसाद द्यावा व आपल्या पाल्यांचे पुढील भविष्य उज्वल करावे. अशा समर्पक भाषेत प्रबोधन केले, प्रास्ताविक प्राथ. मुख्याध्यापिका हेमांगिनी चौधरी यांनी केले. सुत्रसंचलन जयश्री चौधरी तर आभार आशा ठोंबरे यांनी मानले. यावेळी माध्य.शिक्षक अनिल बोरोले, प्रशांत चौधरी, कविता जावळे, समीर तडवी, प्रदिप परखड, दिपक तायडे, चंद्रकांत चौधरी, कमलाकर झोपे, दिपाली सरोदे, पुर्व प्राथ.शिक्षिका रुपाली गाजरे, सुनिता पाटील, वैशाली वैद्य, प्राथ. विदया मंदिर शिक्षिका सुनिता बऱ्हाटे, मिनाक्षी चौधरी, ममता फालक, निकिता भोई, या सर्व शिक्षकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Protected Content