मुंबई: वृत्तसंस्था । मुंबई महानगर प्रदेशात वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली चौकशीचे आदेश देण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी तातडीची उच्चस्तरिय बैठक बोलावली आहे. या बैठकीत आढावा घेऊन पुढील पाऊ उचलले जाणार असल्याचे कळते.
ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी चर्चा करतानाच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. त्यानंतर आता जवळपास सर्वच भागांत वीज पुरवठा सुरळीत झाली असून आता हा प्रकार नेमका घडला कशामुळे?, याचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत.
वर्षा निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीस ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्रसाद तनपुरे , ऊर्जा सचिव असीम गुप्ता उपस्थित राहणार आहेत.
वाचा: राज्य सरकार नियोजनशुन्य, व्यवहारशुन्य; भाजपचा निशाणा
वीज पुरवठा खंडित होण्याला नेमकं कोण जबाबदार आहे?, हा केवळ तांत्रिक दोष आहे की यामागे दुसरे काही कारण आहे?, भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून कोणती खबरदारी घ्यायला हवी?, या सर्व मुद्द्यांवर या बैठकी चर्चा होणार आहे.