मुंबई प्रतिनिधी । मुंबईतील शिवडी येथे दुचाकी पार्किंगवरून झालेल्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुण शेतकऱ्याचा महापालिकेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न
शिवडी येथील हनुमान रोडवरील चाळीत राहणाऱ्या पटेल आणि शेख कुटुंबात सोमवारी रात्री दुचाकी पार्किंगच्या वादावरून जोरदार भांडण झाले. ही दोन्ही कुटुंबं शेजारी राहतात. त्यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. सोमवारी रात्री सुरू झालेला वाद इतका विकोपाला गेला की त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. शेख कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या चाकूहल्ल्यात शाहिद रजाक पटेल (वय २०), साहिल रजाक पटेल (वय १६) आणि अदनान पटेल हे तिघे जखमी झाले. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शाहिद आणि साहिल यांचा मृत्यू झाला.
धक्कादायक : पुण्यातील १७ नर्स, ३ डॉक्टरांना करोनाची लागण
या प्रकरणी शेख कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या घटनेला लॉकडाउनही कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.