मजबुरीत रेमडेसीवीर घेऊन वापरा ; नंतर काळाबाजार करणारांची माहिती पोलिसांना सांगा ; अधीक्षकांचे आवाहन

 

 

जळगाव : प्रतिनिधी ।  कोरोना उपचारांसाठी मजबुरीत रेमडेसीवीर घेऊन वापरा ; त्याला आमची हरकत नाही , मात्र नंतर काळाबाजार करणारांची माहिती पोलिसांना सांगा असे आवाहन आज रुग्णांच्या नातेवाईकांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी केले आहे

 

जळगाव शहरात आज पोलिसांच्या २ पथकांनी या इंजेक्शनचा काळाबाजार करणारे १३ आरोपी २ ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये निष्पन्न करून ९ आरोपींना ताब्यात घेतले आहे . यापैकी डॉक्टर असलेला १ आरोपी फरार आहे . या कारवाईची माहिती वार्ताहरांना देताना पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना हे  आवाहन  केले . यापैकी पहिली कारवाई स्वातंत्र्य  चौकात करण्यात आली

 

पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या अधिपत्याखाली पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या नेतृत्वात एक पथक  तयार करण्यात आले होते  त्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे ,  उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस हेकॉ विजय कोळी , कैलास सोनवणे , पुना महाले ,  पो  कॉ  रवींद्र   पवार ,  प्रशांत  पाठक ,  रवींद्र साबळे ,  फिरोज तडवी यांचा समावेश होता या पथकाने स्वातंत्र्य चौकात कारवाई केली

 

शेख समीर ( वय  23 शिवाजी नगर ) ,  लालचंद कुंभार ( वय   25 ,  खंडेराव नगर  ) सुनील मधुकर अहिरे ( वय 32 , हरी विठ्ठल नगर ) ,  झुल्फिकार अली निसार अली सय्यद (वय  21  ,  इस्लामपुरा,  धानोरा ,  ता – चोपडा ) कयूम  (वय 28 , मास्टर कॉलनी ),  डॉ  आलीम मोहम्मद खान, सय्यद आसिफ सय्यद दिसा व बावीस राणा ( खुबा मशिद जवळ सुप्रीम कॉलनी  ) ,  अजीम शहा  दिलावर शाह  ( रा – सालारनगर ) , जुनेद शहा जॅकी शहा ( वय  २३ ,  रा – ओवस पार्क ,  सालारनगर ) अशी या स्वातंत्र्य चौकात करण्यात आलेल्या कारवाईत आरोपींची   नावे   आहेत .  २ मोटारसायकलसह ५ रेमडेसीवीर इंजेक्शन असा २ लाख ४६ हज्जार ९५० रुपयांचा मुद्देदेमाल पोलिसांनी जप्त केला आहे हे आरोपी २२ हजार , २७  हजार , ३० हजार व ३३ हजार अशा अत्यंत वाढीव किमतीतही हे इंजेक्शन विकत होते अशी माहिती पोलिसांना मिळाली  होती .

 

दुसऱ्या  पथकातील पोलीस निरीक्षक विलास शेंडे , पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बोरसे  यांच्यासोबत पुना   बागुल , प्रवीण भोसले , पो  हे कॉ  रवींद्र तायडे , मनोज पवार ,  पो  कॉ  योगेश ठाकूर , पो  ना  फिरोज तडवी यांनी सापळा रचून अन्य ३ आरोपींना  पकडले. त्यांच्या ताब्यातून २ रेमडेसीवीर इंजेक्शनसह मोटारसायकली , मोबाईल असा १ लाख ३७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . शुभम राजेंद्र चव्हाण ( वय 22 , रा – झुरखेडा , ता -धरणगाव  ) मयूर उमेश विसावे   ( वय  27,  रा – श्रद्धा कॉलनी नंदनवन नगर ) आकाश अनिल जैन ( वय 26 , रा – मानस बिल्डिंग आंबेडकर मार्केट जवळ , धंदा  – मेडिकल नवकार  फार्म )  अशी या आरोपाची  नावे  आहेत

 

या सर्व आरोपींच्या  विरोधात विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

Protected Content