पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सकल मातंग समाजाच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर लहूजी सेनेच्या वतीने महामार्चा काढण्यात आला आहे. या महामोर्चा पाचोरा तालुक्यातील पदाधिकारी यांचा सहभाग नोंदविला आहे.
अनुसुचित जाती प्रवर्गामध्ये “अ”, “ब”, “क”, “ड” नुसार वर्गीकरण झालेच पाहिजे, बार्टीच्या धर्तीवर आर्टी ची स्थापना झालीच पाहिजे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळालेच पाहिजे यासह सकल मातंग समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात २२ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर सकल मातंग समाजाचा महामोर्चा घेण्यात आला. या महामोर्चात जळगांव जिल्ह्यातील लहुजी शक्ती सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे (निपाणे ता. पाचोरा), राजु गायकवाड (गाळण ता. पाचोरा), गजानन चंदनशिव (चाळीसगाव), अण्णा कांबळे (बोरखेडा ता. चाळीसगाव), सुभाष पगारे (गुढे ता. भडगाव) यांचेसह लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व सदस्य महामोर्चात सहभागी झाले होते.