Home धर्म-समाज मी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशंसक, त्यांचा अनादर केलेला नाही : व्यंकय्या नायडू

मी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशंसक, त्यांचा अनादर केलेला नाही : व्यंकय्या नायडू

0
106

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशंसक, तर देवी भवानीचा उपासक राहिलो आहे. त्यांचा अजिबात अनादर केलेला नाही, असे स्पष्टीकरण राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिले आहे.

 

व्यंकय्या नायडून यांनी ट्विटरवरुन आपले स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, ‘मी छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमीच प्रशंसक, तर देवी भवानीचा उपासक राहिलो आहे. शपथ घेताना कोणत्याही घोषणा दिल्या जात नाहीत, याची परंपरेनुसार आठवण सभासदांना करुन दिली. अनादर केलेला नाही. दुसरीकडे “राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू काहीच चुकीचे बोलले नाही. रेकॉर्ड वर फक्त शपथ जाईल, असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तिथेच राजीनामा दिला असता, असे उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.


Protected Content

Play sound