बस वाहकास मारहाण करणाऱ्यास रिक्षा चालकाला शिक्षा

जळगाव प्रतिनिधी । बसचा धक्का लागल्याचा आरोप करुन वाहकास मारहाण केल्याच्या प्रकरणात रिक्षा चालकास दोषी ठरवत न्यायालयाने कोर्ट उठेपर्यंत आणि पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस कैदेची शिक्षा सुनावली. दुसरे तदर्थ व सत्र न्यायाधीश सी.व्ही.पाटील यांनी गुरुवारी हा निकाल दिला.

सैय्यद शरीफ सैय्यद रशीद (२४, रा.नशिराबाद) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, ५ डिसेंबर २०१३ रोजी एकनाथ शंकर पाटील हे भादली येथून एस.टी.बस क्र.(एमएच २० डी ८३३१) घेऊन येत असताना सायंकाळी ५.३० वाजता शहरातील चौबे शाळेजवळ एस.टी.बसचा रिक्षाला कट लागलेला नसताना सैय्यद शरीफ याने बस वाहक शांताराम दिनेश तिवाने यांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती. याप्रकरणी चालक एकनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरुन शनी पेठ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. न्या.सी.व्ही.पाटील यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात फिर्यादी चालक एकनाथ पाटील, वाहक शांताराम तिवाने, तपासाधिकारी जे.के.अहिरे, वैद्यकिय अधिकारी अशा पाच जणांची साक्ष नोंदविण्यात आली. अतिरिक्त सरकारी वकील मोहन देशपांडे यांनी सरकारच्या बाजुनी युक्तीवाद केला. न्यायालयाने पुराव्याअंती कलम ३२३ अन्वये आरोपीला दोषी धरुन कोर्ट उठे पावेतो आणि 500 रू.दंड ,दंड न भरल्यास 15 दिवसाची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून गणेशकुमार नायकर यांनी काम पाहिले.

Protected Content