अंजाळे येथे शॉक लागून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

suside

 

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील अंजाळे येथे बोअरवेल चालू करण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. दशरथ देवसिंग मोरे (वय39) असे मयत युवकाचे नाव आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, दर महिन्याप्रमाणे अंजाळे तालुका यावल येथील विठल मंदिर, वै.जगन्नाथ महाराज समाधी स्थळावर एकादशीचा कार्यक्रम सुरू होता. परंतू भाविकांना पिण्याचे पाणी नसल्यामुळे बोअरवेल सुरू करण्यासाठी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दशरथ मोरे हा युवक गेला. मात्र बराच वेळ झाल्यानंतर ते का परतले नाही? हे पाहण्यासाठी कार्यक्रमास उपस्थित असलेले भाविक गेले. यावेळी दशरथ याचा विजेचा शॉक लागुन मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. घरातील कर्ता पुरूषाच्या अकाली निधनाने संपूर्ण अंजाळे गावात शोककळा पसरली आहे. मयत दशरथच्या पश्चात लहान मुलगा, तीन मुली व पत्नी असा परीवार आहे. यावल येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी. महाजन यांनी मृत दशरत मोरे यांचे शवविच्छेदन केले. तर यावल पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content