‘हमारी कहाणी क्या बताऊ’ ..! सुरत येथे डायमंड फॅक्टरीत काम करणाऱ्यांचे बोल..!! (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कोरोना या भयावह आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लाखो लोग मुंबई, गुजरात येथून आपल्या मूळगावी विविध प्रांतात निघून गेले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तब्बल चार महिने उलटले तरी राष्ट्रीय महामार्गावर काही लोग जातानाचे दृश्य पहावयास मिळाले.

गुजरात राज्यातील सुरत येथे गेल्या सोळा वर्षांपासून हिऱ्यांवर पैलू पाडण्याच्या कारखान्यात काम करणारे यवतमाळ येथील तीन जण तर एक गोंदिया येथील कलावंत मजूर चारचाकी वाहनाने संसाराचा सर्व सामान घेऊन गावी परतले. “गेल्या चार महिन्यांपासून आम्ही केवळ रूमचे भाडे देत होतो, आशेवर होतो की, कामाचा मोबदला मिळेल, हमारी कहाणीही अब बहोत अलग हो गयी है “। असे निराशाजनक बोल त्यांनी सांगितले. पोलिसांचा रस्त्याने त्रास झाल्याचेही ते म्हणाले. आम्ही आता पुन्हा सुरत परतणार नाही, असे स्पष्टीकरण ही त्यांनी प्रतिनिधीस बोलताना रडवेल्या सुरात सांगितले.

 

https://www.facebook.com/watch/?v=315260909651652

Protected Content