मास्टर कॉलनीत बंद घर फोडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मास्टर कॉलनीत बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबविल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मेहरून्नीसा शेख नियाजोद्दीन (वय-५६) रा. मास्टर कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांच्यासोबत मुलगा तौफिक व सुन नाजमीन हे राहतात. मुलगा तौफिक व सून हे दोघे नगरदेवळा ता. पाचोरा येथे कामाच्या निमित्ताने गेलेले होते. त्यामुळे मेहरून्नीसा शेख ह्या शेजारी राहणारा पुतण्याकडे २८ जुलै रोजी रात्री झोपण्यासाठी गेल्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या घराला कुलुप लावलेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ४० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे शुक्रवार २९ जुलै रोजी सकाळी उघडकीला आले. एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content