शाहीर संदाशिव राज्यस्तरीय पँथर गौरव पुरस्काराने सन्मानित

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दलित चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते व तालुक्यातील चुंचाळे/बोराळे येथील रहिवासी असलेले शाहीर सुपडू संदाशिव यांना राज्यस्तरीय पँथर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

दीक्षा भूमी नागपूर येथील डॉ.बाबा साहेब आंबेडकर सभागृह येथे दलीत पँथर सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला. दलीत पँथर सुवर्णमहोत्सव वर्ष १९७२ ते २०२२ या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संविधान रक्षक दल भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल शेंडे तर दलीत पँथर संस्थापक ज.वि.पवार मुंबई,राजेंद्र पाल गौतम दिल्ली, प्रा.रतन लाल दिल्ली. इ.झेड.खोब्रागडे नागपूर, श्रावण गायकवाड ओरंगाबाद, व छाया खोब्रागडे नागपूर हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले आहे.

या कार्यक्रमास सकाळी १० वाजता सुरुवात झाली. संपुर्ण कार्यक्रम हे चार सत्रात पार पडले त्यातही अनेक नामवंत कवी लोकनाथ यशवंत,कवी प्रा.राजेंद्र गोणारकर, कव वनश्री वनकर, कवी राजेश गवळी त्याच बरोबर प्रख्यात वक्ते प्रशांत कनौजिया दिल्ली, प्रख्यात आकर्षण शाम मिरा सिंग दिल्ली, प्रा.दिलीप चव्हाण नांदेड हे सुद्धा आकर्षक मार्गदर्शन ठरले तर याच कार्यक्रमात तिसरे सत्र म्हणून शैलेश नरवाडे लिखित एकांकी नाटक ही आकर्षित ठरले आहे.

चौथे सत्रात अनेक दिग्गजांना पुरस्कार देण्यात आला. त्यातच जळगांव जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व संविधान रक्षक दल भीम आर्मी मध्ये महाराष्ट्र राज्य सचिव या पदावर कार्यरत असलेले यावल तालुक्यातील बोराळे/ चुंचाळे येथील रहिवाशी सुपडू संदानशिव यांचे जळगांव जिल्ह्यात निस्वार्थ पणे फुले, शाहू आंबेडकर चळवळीत चालू असलेले काम बघता त्या कामाची दखल घेत सुपडू संदानशिव यांना देखील दलीत पँथर संस्थापक अध्यक्ष ज.वि पवार यांच्या हस्ते गोल्डन ज्युब्ली सेलिब्रेशन चे मान चिन्ह, पुस्तक, देवून सन्मानित करण्यात आले आहे.

त्याच बरोबर पाचव्या सत्रात कविता सादरी करण व रॅप सिंगींग मध्ये नारायण पुरी ओरंगाबाद,शाहीर चरण जाधव ओरंगाबाद, स्वदेशी मुंबई, वाजीद नांदेड, माही मुंबई,विपीन तातड अमरावती यांनी ही महाराष्ट्रात चाललेल्या जाती वादाच्या विरोधात, नांदेड नामांतराच्या लढाईत घडलेला प्रकार चरण जाधव यांनी आपल्या प्रखड शाहीरीतून मांडला तर डॉ.बाबा साहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतात जमलेल्या संघर्ष महापुरुषांची लढाई आपल्या गीताच्या आधारे सादर केली. सदर कार्यक्रमाप्रसंगी संविधान रक्षक दल भीम आर्मीचे अनेक पदाधिकारी, पँथर प्रेमी आणि अनेक सामाजिक संघटनांमध्ये काम करणारे निस्वार्थी संविधान रक्षक उपस्थित होते.

यावेळी सुपडू संदानशिव यांनी म्हटले की, खर तर हा सन्मान माझा नसून माझ्या सोबत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्ताचा आहे. विशेष आक्रमक दलित पँथर सुवर्ण महोत्सव या कार्यक्रमा प्रसंगी महाराष्ट्र भरातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, उद्योजक याचा सत्कार करण्यात आला. सामान्य चळवळीत कार्यकर्ता ला सन्मानित करणे त्याच्या कार्याची खरी ओळख त्याच्या कामातून होते हे सिध्द आज प्रफुल्ल शेंडे संस्थापक संविधान रक्षक दल भीम आर्मी यांनी दाखवून दिले. भाऊ सारख्या चवळीतील नेत्यांची कार्यकर्ताची आज खरी गरज आहे.

 

 

 

Protected Content