Home क्राईम धक्कादायक : अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार !

धक्कादायक : अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार !

0
48

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत चोपडा पोलीस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षी अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. २ महिन्यांपूर्वी गणेशोत्सवा दरम्यान संशयित आरोपी विलेश दारासिंग पावरा रा, दोंदवाडे ता.शिरपूर जि. धुळे याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिला घरातून फूस लावून पळवून नेत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात असलेल्या एका गावाच्या ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध केले. हा प्रकार घडल्यानंतर अल्पवयीन मुलगी घरी आली. तिच्यावर झालेल्या अतिप्रसंग तिने कथन केला. तिच्या नातेवाईकांसह पिडीता यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी विलेश दारासिंग पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहे.


Protected Content

Play sound