मास्टर कॉलनीत चोरट्यांनी बंद घर फोडले; सोन्याचे दागिन्यांसह रोकड लांबविले

जळगाव प्रतिनिधी । मुलीला भेटण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याच्या बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याचे दागिन्यांसह रोकड असा एकुण १ लाख ४२ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना आज ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, फारूख अब्दुल गफुर देशमुख (वय-६०) रा. नशेमन कॉलनी, केजीएन दुध डेअरी जवळ मास्टर कॉलनी हे पत्नी नाहीदाबी देशमुख यांच्यासह राहतात. घरातच किरकोळ किराणा विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात दरम्यान, मंगळवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता  भुसावळ तालुक्यात वरणगाव येथे राहत असलेली मुलगी हिना पटेल यांच्याघरी भेटण्यासाठी जळगावातील घराला कुलूप लावून गेले होते. मुलीला भेटून आज गुरूवार ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता घरी आले असता त्यांनी लावलेले कुलूपाऐवजी दुसरे कुलूप लावलेले आढळून आले. त्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला असता घरात चोरी झाल्याचे उघडकीला आले. कुलूप चोरट्यांनी घराला आगोदर लावलेले तोडलेले दिसून आले. घरातील लाकडी कॉटमधून सोन्याचे दागिने आणि ६५ हजाराची रोकड असा एकुण १ लाख ४२ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. तसेच तर चोरट्यांनी चोरी करून घरात असलेले दुसरे कुलूप घराला लावून पसार झाल्याचे दिसून आले. दरम्यान नेमके किती मुद्देमाल चोरी गेला याची पुर्ण माहिती मिळालेली नाही. घटनास्थळी एमआयडीसी पोलीसांनी घाव घेतली असून पंचानामा करण्यात आला आहे. याप्रकरणी फारूख देशमुख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अनिसोद्दिन शेख करीत आहे.

Protected Content