सावधान : तेढ निर्माण करणार्‍या पोस्ट शेअर केल्यास गुन्हा दाखल होणार

जळगाव प्रतिनिधी । दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल अशा पोस्ट सोशल मीडियातून शेअर केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी दिला आहे.

सध्या कोरोना व्हायरच्या प्रतिकारासाठी लॉकडाऊनचा कालावधी सुरू आहे. यात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. यात डिजीटल माध्यमातून दोन जाती, धर्म वा समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल असे कंटेंट शेअर करण्यात येत आहे. या प्रकारे तेढ निर्माण होणारे तसेच तिरस्कार निर्माण करणारे कंटेंट शेअर करणे हा कायद्याने गुन्हा आहे. फेसबुक, व्हाटसअ‍ॅप, ट्विटर आदींसह अन्य माध्यमातून या प्रकारच्या पोस्ट शेअर केल्यास संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा आज सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी दिला आहे.

या संदर्भात डॉ. रोहन यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, या संदर्भात तेढ निर्माण करणारे पोस्ट शेअर करणे, याला लाईक करणे अथवा यावर कॉमेंट करणे या बाबी गुन्हा या वर्गवारीत येतात. यात एक लाख रूपयांपर्यंत दंड आणि तीन वर्षांपर्यंत शिक्षेचे प्रावधान करण्यात आलेले आहे. यामुळे जनतेते सोशल मीडियात सांभाळून व काळजीपूर्वक पोस्ट कराव्यात असे आवाहन डॉ. निलाभ रोहन यांनी केले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content