मालोद गृप ग्रामपंचायत कार्यलयात चोरी : यावल पोलिसात गुन्हा दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मालोद गृप ग्रामपंचायत कार्यालयातून एलईडी टीव्ही, डीव्हीआर हार्ड डिस्क, कॅमेरा असा एकूण ३३ हजार ३५० किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लंपास केला आहे. यासंदर्भात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, मालोद तालुका यावल येथील गृप ग्रामपंचायत कार्यालयाचे दरवाजाचे कडीकोंडा व कुलूप तोडून शुक्रवार दि. २७ मे संध्याकाळी ५.३० ते २८ मे च्या सकाळी ६.३० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली आहे. यात त्यांनी १६ हजार ५०० रुपये किमतीचा एलईडी टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे २ जीबी क्षमतेची १३ हजार ३०० रुपयांची हार्ड डिस्क तसेच ३ हजार ५०० किमतीचा आयपी कॅमेरा असा एकूण ३३ हजार ३५० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या संदर्भात मालोदचे ग्रामसेवक राजू अन्वर तडवी यांच्या फिर्यादीनुसार यावल पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.

Protected Content