यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मारूळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावल तालुक्यातील मारूळ येथील ग्रामपंचायत कार्यालय येथील सभागृहामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी सैय्यद जावेद अहमद हे होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकत सांगितले की,पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर या उत्कृष्ट शासक व कर्तृत्ववान आदर्शवादी राजमाता होत्या. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून आजच्या आधुनिक पिढीच्या महिलांनी चालुन आपले कर्तव्य सिद्ध करावे जेणेकरून महिलांना आजच्या पेक्षाही सर्व क्षेत्रात चमकदार कामगिरी करता यावी व आपल्या कर्तत्वाचा ठसा उमटविता आला पाहिजे त्यासाठी पुरुषांनी या पुरुषप्रधान संस्कृती मध्ये महीलांनी साथसोबत देणे हे आपले आद्य कर्तव्य समजून महीलांना संन्मानजनक वागणूक दिली पाहिजे असे उदगार आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मारुळचे सरपंच तथा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे यावल तालुका उपाध्यक्ष असद सैय्यद, पोलीस पाटील नरेश मासोळे, फैजपूर मंडळ अधिकारी तडवी , डॉ नदीम सैय्यद ,जेष्ठ ग्रा.प.सदस्य मुर्तेजा अली सैय्यद, गफ्फार तडवी, अमिर तडवी, युवराज इंगळे ,कालु तायडे हे होते.
करोना या जागतिक माहामारीमध्ये जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य व जबाबदारी ओळखुन आपले कर्तव्य प्रामाणिक पणे बजाविणा-र्या महीला स्त्रीरोग तज्ञ डॉ गजाला सैय्यद, तसेच अंगणवाडी सेविका सौ सुनंदा तायडे यांच्या कार्याचा गौरव करुन मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह व रोख रक्कम पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविका साबेरा सैय्यद, फरिन सैय्यद, आशा स्वयंसेविका नाजिमा परविन यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व बाळासाहेब तायडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कारकुन परवेज अख्तर सैय्यद, सलिम सैय्यद, शफिकुद्दीन फारुकी यांचे सहकार्य लाभले.