‘माती फाऊंडेशन’तर्फे आदिवासी पाड्यात किराणा कीटचे वाटप

यावल प्रतिनिधी । राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी आदीवासी बांधवांना हाताला काम नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील भालोद येथील माती फाऊंडेशनच्या वतीने आदीवासी बांधवांना किराणा कीटचे वाटप करण्यात आले.

लॉकडाऊनमुळे संकटसमयी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून हिंगोणे गावापासून जवळच असलेल्या सातपुडापर्वताच्या पायथ्याशी मोर धरण परिसरात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवाना भालोद येथील माती फाउंडेशनच्या वतीने आदिवासी पाड्यांवरील गरजू गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले. त्यात गहू, तांदूळ, तेल, मीठ, हळद, मसाले आदी वाटप करण्यात आले. यावेळी माती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक जावळे, उपाध्यक्ष तुषार परतणे, सचिव खेताराम चौधरी, कोषाध्यक्ष चेतन चौधरी, चेतन पाटील, मिलींद चौधरी, ओमेश झांबरे आदी उपस्तीत होते. आदिवासी बांधवानी माती फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मदतीमुळे भारावलेल्या आदर्श बांधवांनी संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.

Protected Content