पिळोदा खुर्द सरपंचपदी सरला पाटील तर उपसरपंचपदी जगन पाटील

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील  पिळोदा खुर्द येथील ग्रामपंचायतच्या  सरपंचपदी गिरधर बाबुराव पाटील यांचा गटातील  सरपंचपदी सरला विनोद पाटील तर उपसरपंचपदी जगन गोविंद पाटील यांची मतदानाव्दारे निवड करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातीत पिळोदा खुर्द ग्रामपंचायत कार्यलयात साकळी मंडळ अधिकारी पी.ए.कडनोर यांचा अध्यक्षतेखाली सरपंच व उपसरपंच पदाची निवड करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सरपंच व उपसपंचपदासाठी प्रत्येकी दोन अर्ज दाखल करण्यात आले होते, त्यात सरला पाटील यांना चार मते तर रजनीगंधा पाटील यांना दोन मते पडली तर उपसरपंच पदासाठी जगन पाटील यांना पाच मते तर शारदा गजानन सपकाळे यांना एक मत पडल्याने सरपंचपदी सरलाबाई विनोद पाटील व उपसरपंचपदी जगन गोविंद पाटील यांची निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी पी.ए.कडनोर यांनी जाहीर केले.

सरपंच व उपसरपंचपदी निवड घोषीत झाल्यावर सरपंच व उपसरपंच गटांचे समर्थक व ग्रामस्थांच्या वतीने फटाक्यांची आतीष बाजी करण्यात येवुन आंनद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यं कैलास पाटील, सौ. अलका कोळी, व मच्छीद्र पाटील, मा.सरपंच  गिरधर पाटील ,समाधान कोळी ,दिनकर पाटील, समाधान कोळी, गोरख पाटील ,ईश्वरलाल पाटील, मा.पो.पा.गयभु पाटील आदी उपस्थीत होते  ग्रामसेवक हेमंत जोशी यांनी सहकार्य केले तर या क्षेत्राचे हेड काँन्सटेबल गोरख तात्या पाटील यांनी आपला बंदोबस्त चोख ठेवला.

 

Protected Content