हिंदू धर्मभावनांचा अपमान करणाऱ्या लक्ष्मी चित्रपटावर तात्काळ बंदी आणा

 

यावल, प्रतिनिधी । ‘लक्ष्मी’ हा चित्रपट ९ नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित होणार असून यामध्ये अभिनेता अक्षय कुमार हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाने हिन्दु धर्मभावनांचा अपमान होत असून त्यावर तात्काळ बंदी आणावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनाचा आशय असा की, यापूर्वी या चित्रपटाचे नाव लक्ष्मी बॉम्ब असे होते हिंदूंच्या जोरदार विरोधानंतर शबीना खान आणि तुषार कपूर निर्मित या चित्रपटाच्या नावात तोंडदेखला बदल करून आता या चित्रपटाचे नाव लक्ष्मी असे करण्यात आले आहे .नावात जुजबी पालट करत हिंदूंच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे व या चित्रपटाला हिंदू समाजाने विरोध करण्यामागे लव्ह जिहादला चालना आणि हिंदूंच्या धर्मभावनाच्या अवमान ही दोन प्रमुख कारणे होती. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी या दोन्ही कारणांना बगल दिली आहे या आशयाचे निवेदन हिंदू जनजागृती समिती, यावल यांच्यातर्फे तालुक्याचे नायब तहसीलदार पवार यांना देण्यात आले. लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाच्या नावामुळे श्रीलक्ष्मीचे विडंबन होत असल्याने हिंदू जनजागृती समितीने त्यासंदर्भात केंद्रशासन , राज्य शासन व अनेक चित्रपट परिनिरीक्षण मंडळाना निवेदनही दिले आहे. चित्रपटाच्या नावातून केवळ बॉम्ब हा शब्द काढून टाकल्याने श्रीलक्ष्मी देवीचा अनादर रोखला जात नाही. नावात पालट केल्यामुळे चित्रपटातील देवीशी संबंधित संदर्भ रहित झाले असे होत नाही हा चित्रपट श्रीलक्ष्मीदेवी व देव देवीची महती सांगणारा किंवा दिवाळीशी संबंधित असता तर चित्रपटाचे नाव श्रीलक्ष्मी ठेवण्याचे कारण समजू शकलो असतो. मात्र चित्रपटाच्या आणि लक्ष्मीदेवीचे महतीचा अजिबात संबंध नसल्याचे चित्रपटाच्या अधिकृत ट्रेलरवरून स्पष्ट होते, असे हिंदू जनजागृती समितीचे म्हणणे आहे .
चित्रपटाच्या अधिकृत ट्रेलरमध्ये आसिफ या नावाने मुसलमान व्यक्तिरेखा साकारत असलेले अभिनेते अक्षय कुमार यांच्या शरीरात एका तृतीयपंथीयांचे भूत संचारल्याचे दाखवण्यात आले आहे. अभिनेता देवी प्रमाणे मोठे लाल कुंकू लावून केस मोकळे सोडून हातात त्रिशूल घेऊन नाचताना दाखवले आले असून कुटुंबातील व्यक्तींना त्रास देण्यासाठी जाते तेव्हा कुटुंबातील व्यक्ती हिंदूंच्या विविध देवतांची चित्र पुढे करतात मात्र भूत त्याला जुमानत नाही असे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे म्हणणे आहे.
चित्रपटात नायकाचे नाव आसिफ आणि नायिकेचे नाव प्रिया असे आहे. चित्रपट कंचना या दक्षिण भारतीय चित्रपटाचा रिमेक असून त्यामध्ये नायकाची व्यक्तिरेखा मुसलमान नाही तरी हिंदी चित्रपटात नायक मुसलमान तर युती हिंदू धर्मीय दाखवण्यात आली असून यातून हेतुतः लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले असूनही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
नुकतेच हरियाणातील निकिता तोमर हिची तौसीफ या धर्मांधांने गोळ्या घालून हत्या केल्याचे प्रकरण ताजे असताना अशा प्रकारचे चित्रपट निर्मिती करणे म्हणजेच दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे कुटील डाव चित्रपटसृष्टीचा दिसून येतो तरी हिंदूंच्या भावना समजून सदर चित्रपटावर लवकरात लवकर बंदी आणावी असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन देतेवेळी हिंदू जनजागृती समितीचे चेतन भोईटे , हिंदू समाज पार्टी चे राहुल कोळी, कुलदीप राजपूत, बजरंग ग्रुप बोरावल खुर्द , कैलास पाटील, निलेश माळी हे उपस्थीत होते.

Protected Content