जळगाव लाईव्ह ट्रेंडन्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचा पाठलाग करत दगड मारून अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याची घटना गुरुवार १ जून रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात २६ वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २३ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता गावात राहणारा गणेश बाबुराव कोळी यांनी तिचा पाठलाग केला. नंतर तिला दगड मारला. दगड मारण्याचा जाब विचारला असता त्याने महिलेची अश्लिल वर्तन करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने तिथेच आरडा ओरड केली. त्यानंतर तो पसार झाला. पिडीत महिलेने नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशय आरोपी गणेश बाबुराव कोळी यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुरुवार १ जून रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव करीत आहे.