महाराष्ट्र साहित्य परिषद, चाकण शाखा आयोजित साहित्य गौरव पुरस्कार

पुणे – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र साहित्य परिषद, चाकण शाखेच्या वतीने साहित्य गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. यात पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली आहे.

शाखेने काव्य संग्रह व कादंबरी या प्रकारांमध्ये साहित्य मागवले होते. यात कविता प्रकारात खुप जास्त प्रतिसाद आल्याने यात तीन स्पर्धकांसह एका बालकाव्य संग्रहाची निवड करण्यात आलेली आहे. कथासंग्रह प्रकारात एक व बालकथा संग्रह एक पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली आहे. तर कादंबरी प्रकारात एक कादंबरी निवडली आहे. विशेष प्रकार म्हणून कविताविषयी प्रगल्भ समिक्षात्मक पुस्तकाची निवड केली असून स्थानिक साहित्य व साहित्यिक म्हणून एक निवड केली आहे.

 

निवड झालेले पुरस्कारार्थीं –

 

काव्य प्रकार –

समांतर – अभिषेक नाशिककर.

गझलचॉंद – सिराज करिम शिकिलकर.

धगधगते तळघर – उषा हिंगोणेकर.

गरगर मोळ्या (बालकाव्य) – रावसाहेब जाधव

 

कथासंग्रह –

बवाळ – दयाराम पाडलोस्कर.

जाणीव (बालकथा संग्रह) – रश्मी गुजराथी.

 

कादंबरी –

दोसतार- चकोर शहा.

 

विशेष प्रकार म्हणून –

मराठी कविता: परंपरा आणि प्रवाह – प्रा.डॉ.सुहासकुमार बोबडे.

 

स्थानिक साहित्य प्रोत्साहनपर –

क्षमाशीलता – ॲड.नाजिम गुलाब शेख.

 

या पुरस्काराचे वितरण रविवार, दि.८ मार्च २०२२ रोजी दुपारी ४ वाजता. मैत्री हॉल, श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, चाकण, ता.खेड, जि.पुणे येथे संपन्न होणार असल्याचे शाखेचे अध्यक्ष मनोहर गिलबिले आणि कार्यवाह डॉ. विजय गोकुळे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Protected Content