महिलांसाठीचे रूग्णालय सुरू करा- राष्ट्रवादी अर्बन सेलची मागणी

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयावर पडणारा भार व तेथील असुविधांचा विचार करता, आधी मंजूर करण्यात आलेले वुमेन्स हॉस्पीटल सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी अर्बन सेलतर्फे जिल्हाध्यक्षा अश्‍विनी विनोद देशमुख यांनी केली आहे.

राष्ट्रवादी अर्बन सेलच्या जिल्हााध्यक्षा अश्‍विनी विनोद देशमुख यांनी एक पत्र जारी केले आहे. यात म्हटले आहे की, आज आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजीत दादा पवार यांच्याकडे मंजूर झालेले वुमेन्स हॉस्पिटल हे काही किरकोळ कारणामुळे जसे वीज पाणी या सारख्या अडचणीमुळे प्रलंबित पडलेले वूमेन्स हॉस्पिटल सुरू करण्याची विनंती केली आहे. महिलांचे रूग्णालय सुरू झाल्यास आपल्या सिव्हील हॉस्पिटल वरील खूप मोठा भार कमी होऊन महिलांच्या आरोग्याविषयी समस्यांकडे काळजीने जातीने लक्ष देता येईल गरीब मध्यमवर्गीय गरोदर महिलांची यामुळे मोठी सोय होणार आहे व खाजगी मधील न परवडणार्‍या फी पासून सुटका होईल. जळगाव जिल्हा मोठा असल्यामुळे सर्वच भार हा सिव्हिल हॉस्पिटल वर येतो त्यामुळे महिला पेशंट कडे जातीने लक्ष देणे शक्य होत नाही वुमेन्स हॉस्पिटल सुरू झाल्यास महिला पेशंट तसेच गरोदर महिलांची सोय होईल जिल्ह्यासाठी ती अत्यंत निकडीची गरज झाली आहे. यासंदर्भात आम्ही सकाळीच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे.

दरम्यान, या पत्रात पुढे म्हटले आहे की, जळगाव मध्ये कोरोना ने कहर माजवला आहे याला जबाबदार प्रशासनातील समन्वयाचा अभाव हेच मुख्य कारण आहे अजित दादांचे प्रशासन हाताळण्याचे कौशल्य सर्वांनाच परिचित आहे म्हणून आम्ही आज पत्राद्वारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती केली आहे की आपण जळगाव जिल्ह्याला भेट द्यावी व प्रशासनाला गतिमान करावे.प्रशासनाच्या आपसात समन्वय नसल्यामुळे जिल्ह्यावर कारोना चे भयानक मोठे संकट उभे राहिले असून त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड दहशत पसरलेली आहे सगळीकडे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. उपचाराविना आजाराने सुद्धा लोक मरत आहेत हे चित्र बदलणे अत्यंत गरजेचे आहे आदरणीय दादाच हे चित्र बदलू शकतात दादांमध्ये प्रशासन हाताळण्याचे व ते गतिमान करण्याचे कौशल्य आहे हे सगळेच जाणून आहे आम्ही त्यासाठी जळगावला भेट द्यावी अशी त्यांना विनंती केली आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्बन सेलच्या जिल्हाध्यक्ष अश्‍विनी विनोद देशमुख व समन्वयक मुविकोराज कोल्हे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Protected Content