महाविकास आघाडी सरकार भक्कम, कुणी फुटलेच तर तीन पक्षांच्या ताकदीसमोर निवडूनच येणार नाही : जयंत पाटील

 

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजस्थानची पुनरावृत्ती होण्याचा प्रश्नच नाही. सरकारमधील आमदार फुटलाच तर फुटलेल्या आमदारासमोर आमच्या तिन्ही पक्षाचा एकच उमेदवार उभा राहिल. त्यामुळे तीन पक्षाच्या ताकदीसमोर फुटलेला आमदार निवडूनच येऊ शकणार नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

 

सचिन पायलट यांनी बंड केल्यामुळे राजस्थानमधील राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आले आहे. याच दरम्यान महाराष्ट्रातही ऑक्टोबरमध्ये सरकार पाडण्याच्या जोरदार चर्चा काही दिवसापासून सुरू आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी या सर्व चर्चा सपशेल फेटाळून लावल्या आहेत. चंद्रकांत पाटील आव्हानावर देखील जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाने एकदा स्वतंत्र लढून बघाव, राज्यात त्यांना ६०-६५ जागावरच समाधान मानावे लागेल. त्यापेक्षा ते अधिक जागा जिंकूच शकत नाहीत, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

Protected Content