किनगाव येथे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची आरोग्य तपासणी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरीकांची आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यात मधुमेह, उच्च रक्तदाब, मलेरिया आणि ताप आदींची तपासणी करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग ठेवून किनगाव आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. मनिषा महाजन यांनी शिस्तीने नागरिकांची आरोग्य तपासणी केली. ‘डॉक्टर आपुल्या दारी, संकल्प कोरोनामुक्ती’ हे उद्देश समोर ठेवून डॉक्टर, आरोग्य सेविका, आरोग्यसेवक, शिपाई आणि आशावर्कर यांनी चक्क हनुमान मंदिर समोर टेबल, खुर्ची टाकून रुग्ण तपासणी केली. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, खरं तर कोरोना सुरू झाल्यापासून लोकांमध्ये भय निर्माण झाले आहे. त्यामुळे लोक शासकीय रुग्णालयात येत नाही. तपासलेल्या रुग्णांपैकी नवीन मधुमेहचे चार रुग्ण आणि उच्च रक्तदाबाचे सात रुग्ण आढळून आले. २४ रक्त नमुने जागी घेतल्याने थंडीतापचे प्रमाण कमी करण्यात आले आहे.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
वैद्यकिय अधिकारी डॉ. मनिषा महाजन, डॉ. सागर वारके, आरोग्य सहहयिका उषा पाटील, आरोग्यसेविका के.जी. इंगळे, आरोग्यसेविक जे.के. सोनवणे, शिपाई सरदार कानाशा सर्व आशा ताई याचे मोलाचे सहकार्य लाभले. यामुळे जिल्हा आरोग्य आधिकरी डॉ.दिलीप पोटोडे, तालुका आरोग्य आधिकरी डॉ.हेमंत बऱ्हाटे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र चे डॉ. मनिषा महाजन आणि सर्व कर्मचारी चे कौतुक केले आहे.

Protected Content