महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे रविवारी रास्ता रोको करणार – शेतकरी नेते सुनील देवरे

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । व्यापारींचे हित करण्यासाठी देशात कापुस असतांना देखील बाहेरून आर्यात करण्यात येत आहे. त्यामुळे देशातील कापसाचा भाव कमी करण्यात आला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून खूप मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना झाले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी कजगाव नाक्यावर रास्ता रोखून शासनाचे लक्ष वेधून कापूस भाववाढ करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

संघटनेच्या मागण्या

१) आम्हाला प्रती क्विंटल ८०००/- हजार पर्यत उत्पन्न घेण्यासाठी खर्च होतो तरी आम्हाला हमी भाव हा कमींत कमी १३०००/- एवढा मिळावा.

 

२) ज्या पद्धतीने आपण इतर योजनेला सबसिडी देत असतात त्या पद्धतीने कापसाला सबसिडी अदा करावी.

उदाहरणार्थ :- कापूस या पिकाला १३०००/- हजार एवढा हमी भाव द्यावाच आणि आमचा कापूस शासनाने खरेदी करावा, जर आमचा कापूस शासन खरेदी करीत नसेल आणि खाजगी व्यापारी यांना बाजाराच्या चढ उतारानुसार हमी भावाला घेता येत नसेल किवा शक्य होत नसेल तर शासनाने यावर सबसिडी पुढीलप्रमाणे द्यावी, कापसाचे भाव जर खाजगी व्यापारी ८०००/- हजार प्रती क्विंटल घेत असेल ( खूपच मंदी आहे अथवा केंद्र शासनाने बाहेरून कापूस आयात केला आहे तर किवा अन्य काहीही ) तर त्यावर आम्हाला प्रती क्विंटल ५०००/- हजार एवढी सबसिडी थेट आमच्या आधार लिंक बँक खात्यावर वर्ग करण्यात यावी. म्हणजेच आम्हाला ८००० + ५०००= १३०००/- प्रती क्विंटल भाव मिळेल.

 

३) ज्या पद्धतीने शासकीय नोकरांना वाढत्या महागाई नुसार महागाई भत्ता (वेतन आयोग) वाढविण्यात येत असतात अगदी त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या हमी भावात दरवर्षी 15% वाढ करण्यात यावी. कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो सर्वाना अन्नधान्य उत्पादन करतो म्हणून हा आमचा अधिकार आहे.

 

४) तेलंगाना राज्यात शेतकर्यांना बी-बियाणे व खते घेण्यासाठी थेट बँक खात्यावर दर सहा महिन्याला प्रती एकर ५०००/- हजार रुपये म्हणजेच वर्षाला प्रती एकर १००००/- हजार रुपये ते एक एकर ते पुढे कितीही क्षेत्र असो कोणतीही मर्यादा नाही या पद्धतीने रयतु बंधू या योजने अंर्तगत थेट आधार लिंक बँक खात्यात वर्ग केले जातात तर आपला महाराष्ट्र प्रगत राज्य असून आम्हा शेतकऱ्यांना प्रती एकर प्रती वर्ष कमीतकमी २००००/- हजार रुपये एक एकर ते पुढे कितीही क्षेत्र असो कोणतीही मर्यादा नसावी या पद्धतीने थेट आधार लिंक बँक खात्यात वर्ग करण्यात यावे.

 

५) शेतकऱ्यांच्या विद्यत पंपाना २४ तास वीज द्यावी किवा “मागेल त्याला सौरपंप अशी योजना राबवून ४८  तासाच्या आत मोफत सौरपंप उपलब्ध करून देण्यात यावा. व इतर सर्व सुलतानी अटी,शर्ती रद्द कराव्यात.

 

६) गिरणा खोरे नारपार नदी जोड प्रकल्पाचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे.

 

७) तेलंगाना राज्याने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना ट्रक्टर योजना सुरु आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी योजना सुरु करावी.

 

८) पिक विमा नुकसान भरपाई हि अत्यल्प मिळाली असून शेतकार्यानीची फसवणूक झाली आहे त्यामुळे विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना सरसगट प्रती हेक्टर ३८००० अशी मिळावी.

 

९) महाराष्ट्रातील बंद पडलेल्या सर्व छोटे मोठ्या पाठचारी ,सिंचन प्रकल्प सुरु करण्यात यावीत.

 

१०) शिरसमणी ते भोंडन या अपूर्ण असलेल्या पाटाचे काम पुर्ण करण्यात यावे.

 

११) नगाव- पळासखेडे सीम – मोरफळ -खोलसर या अपूर्ण असलेल्या पाटाचे काम पुर्ण करण्यात यावे.

 

१२) तामसवाडी धरणातून महाळपूर – शिरसोदे – बहादरपूर – भिलाली या गावापर्यंत पाण्याचे आवर्तन सोडावे.

Protected Content