महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर ; राज्याचा निकाल ९०.६६ टक्के

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा बारावीचा निकाल ९०.६६ टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षी हा निकाल ८५.८८ टक्के लागला होता. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात.

 

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे निकाल जाहीर होण्यास बराच उशिर झाला. मागच्या वर्षी 28 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे बारावीचा निकालाला बराच विलंब झाला.परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण १५,०५,०२७ विद्यार्थ्यांपैकी ८,४३,५५२ विद्यार्थी तर ६,६१,३२५ विद्यार्थिनी आहेत. राज्यभर एकूण ३,०३६ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती.

Protected Content