महाराष्ट्र दिनी शैलेश कुलकर्णीने साकारली रांगोळी

 

पाचोरा, प्रतिनिधी !  येथील कलाशिक्षक तसेच रांगोळीकार व चित्रकार शैलेश कुलकर्णी यांनी  महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रांगोळीच्या माध्यमातून “घरीच रहा व सुरक्षित रहा” असा सामाजिक संदेश देणारी रांगोळी रेखाटली आहे.

 

४ बाय ४ फूट या आकाराची रांगोळी रेखाटण्यासाठी शैलेश कुलकर्णी यांना केवळ दोन तासाचा कालावधी लागला. सध्याच्या काळात कोरोनाशी लढण्यासाठी आपण घरीच राहू व काळजी घेऊ तसेच विविध छंद जोपासून मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करू, असा संकल्प महाराष्ट्र दिनी घेऊन कोरोनाला हरवू या, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

Protected Content