महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र नाभिक महामंडळाशी संलग्न असणार्‍या जळगाव जिल्हा कर्मचारी संघटना स्थापन करून जिल्हा कार्यकारिणी शानभाग सभागृह येथे घोषित करण्यात आली.

विभागीय अध्यक्ष नानाभाऊ शिरसाठ व जिल्हाध्यक्ष रवींद्र नेरपगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नाभिक महामंडळाशी संलग्न असणार्‍या जळगाव जिल्हा कर्मचारी संघटना स्थापन करून जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात जिल्हाध्यक्षपदी मनोहर खोंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

उर्वरित कार्यकारणीत जिल्हा उपाध्यक्ष संजय पवार (भडगाव), कार्याध्यक्ष संजय वाघ (बोदवड), संपर्क प्रमुख किरण नेरपगार (चाळीसगाव), सरचिटणीस विजय ठाकरे, जिल्हा प्रवक्ता कुणाल गालफाडे (भुसावळ), प्रसिध्दी प्रमुख राजेंद्र बहळकर, धनराज बोरनारे (रावेर), नारायण श्रीखंडे (मुक्ताईनगर), देविदास बिरारी (अमळनेर), चंद्रकांत निकम (पारोळा), प्रा. रितेश महाले (पाचोरा), नंदलाल वाघ (चोपडा), डॉ. राजेंद्र साळुंखे (यावल), केशव आहिरराव (एरंडोल), रोहिदास वाघ (भडगाव), मंगेश पांडे, कमलाकर बनाईत (भुसावळ) यांच्या सह जिल्हा तालुका कार्यकारिणी पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

दरम्यान, याच कार्यक्रमात नाशिक बोर्डावर संचालकपदी संजय वाघ (चाळीसगाव), एलआयसीमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त रवींद्र सैंदाणे (चोपडा), डॉ. ईश्‍वर सोनगीरे यांना पीएच.डी मिळाल्या बद्दल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शिवाजीराव बहाळकर, पृथ्वीराज सोनवणे, कुमारजी सिरामे, राजकुमार गवळी यांच्या सह जिल्हाभरातून कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content