धरणगाव, प्रतिनिधी । मुंबई येथे महाराष्ट्रातील शासन मान्यता प्राप्त ग्रंथालय कार्यकर्ता दोन दिवशीय शिबिर दि. २४ व २५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र ग्रंथालय सेनेतर्फे वाचन संस्कृती टिकून राहण्यासाठी व आपल्या विविध मागण्यांसंदर्भात शिबिरात ग्रंथालय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास खा. अनिल देसाई, मंत्री मा.सुभाष देसाई , मंत्री ना.गुलाबराव पाटील,मंत्री ना.उदय सामंत, मंत्री ना.एकनाथ शिंदे, माजी मंत्री मा.सचिन अहिर, माजी मंत्री आ.रविंद्र वायकर, माजी मंत्री मा.जयदत्त आण्णा क्षीरसागर, आ.सदा सरवणकर, शिल्पाताई सरपोतदार इत्यादी यावेळी उपस्थित राहणार आहे. ग्रंथालय सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र ग्रंथालय सेना उपप्रमुख पी. एम. पाटील सर, जिल्हा प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, अरुण मोरे, सुनील जाधव, अरुण पाटील दिलीप पाटील, रवींद्र पाटील, भरत चौधरी, श्रीकांत पाटील, दिलीप पाडगावकर यांनी केले असल्याचे ग्रंथालय सेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेश पी.पाटील यांनी कळविले.