तळई गावात अफवेला उधाण ; अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा

कासोदा ता. एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील तळई गावात व परिसरात पुण्याहून आलेले दोन तरुण हे कोरोना पॉझिटीव असल्याची अफवा पसरवली जात आहे. यामुळे गाव व परिसरात लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, अशी अफवा पसरविणाऱ्यानावर कायदेशीय कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

कोरोना संसर्ग असलेले दोन तरुण पुणे येथून आल्याची चर्चा पूर्ण तळई गावात आजूबाजूच्या परिससरात काही नागरिक पसरवत आहे. यामुळे गावात परिसरात लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही फक्त अफवा आहे व या अफवेला कोणीही बळी पडू नये असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र तळई व सरपंच यांनी ग्रामस्थांना केले आहे. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व कोणीही घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. अफवा पसरवणे कायद्याने गुन्हा आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे कासोदा पोलिस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव यांनी सांगितले.

Protected Content