महाराष्ट्रात लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका ?

मुंबई वृत्तसंस्था– महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची उद्या अचानक बैठक आयोजित करण्यात आली असल्याने राजकीय वर्तुळात विधानसभा भंग होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राज्याची विधानसभा भंग करुन, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता त्यामुळे बळावली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता असून, मुंबईत मंत्रालयात या संदर्भात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहेत. शिवाय, एकत्र निवडणुकीसाठी भाजपकडून चाचपणीही सुरु असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. गेल्या सहा दिवसांपासून सरकारच्या वरिष्ठ पातळीवर विधानसभा एकत्र घेण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुप्तहेर खात्याच्या वरिष्ठ सूत्रांनी याबाबत माहिती दिली. भाजपचा लोकसभेबरोबर विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतल्याची माहिती असून, भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना मतदारसंघांसाठी सरासरी १० कोटींचा निधी गेल्या काही दिवसात दिला गेला आहे. शिवाय, राज्यातल्या अनेक मोठ्या कामांच्या उद्घाटनांचा गेल्या १० दिवसात सपाटा लावण्यात आला आहे. त्यावरून या दोन्ही निवडणुका एकत्र होण्याची अटकळ राजकीय वर्तुळात लावली जात आहे.

Add Comment

Protected Content