मुंबई (वृत्तसंस्था) पुण्यात एकाला आणि नागपूरमध्ये दोन करोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १७ वर पोहचली आहे.
अमेरिकेहून १ मार्च रोजी पुण्यातील नागरिक परत आला होता. त्याची तपासणी १२ मार्च रोजी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १० वर गेली आहे. दुसरीकडे अमेरिकेहून पाच दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्या व्यक्तीच्या संपर्कातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनाने कोरोना विषाणूला जगभरात परसलेला साथीचा आजार म्हणून घोषित केले आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात ४३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे याला जगभरात पसरलेला साथीचा आजार म्हणता येईल, असे जागतिक आरोग्य संघटनाने सांगितले आहे.